मंत्री पीयूष गोयलांनी विमानतळावर बसून फाईलींवर केल्या सह्या

मुंबई/4 नोव्हेंबर – भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा विमानत ळावरील एक व्हिडीओ समोर आला आहे. पीयूष गोयल हे न्यूझीलंड दौर्‍यावर रवाना होण्यासाठी विमानतळावर विमानाची प्रतिक्षा करत थांबले होते. मात्र, विमानाला आणखी वेळ असल्याने पीयूष गोयल हे विमानतळावरच बसून आपलं काम पूर्ण करत फाईलींवर सह्या करत असल्याचे पाहायला मिळाले आहेत. प्रवास करत असताना विमानतळावर मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत काम पूर्ण करत असताना एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ काढला आणि त्यांना काही प्रश्न देखील विचारले. त्यावर उत्तर देताना पीयूष गोयल यांनी म्हटलं की, ‘आपण वेळ का वाया घालवायचा? माझ्या विमानाला आणखी थोडा वेळ आहे. त्यामुळे थोड्यावेळ काम करत बसलो आहे, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button