मला फोनवरुन धमक्या; चाकणकरांचा रोल करू नका

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा

मुंबई/27 मे- नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक अत्याचारप्रकरण आता 70 मिमि पडद्यावर झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शुटींग सुरू होणार असून चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी चित्रपटात काम करू नये, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये, असे म्हणत दीपाली (ऊळरिश्रळ ीरूूरव) यांना धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावाच त्यांनी केला आहे. अशोक खरात प्रकरणावर चित्रपट (उळपशार) येत असताना आणि रोल करत असताना कोणीही कलाकाराला दबावात आणू नये. मला काही धमक्यांचे फोन येत आहेत, पण कर नाही त्याला डर कशाचा? हे माझं चुकीचं आहे, असे शिवसेनेतील नेत्या तथा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी म्हटले. दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर आधारित सिनेमा लवकरच येत आहे. त्याच अनुषंगाने अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी, आपल्याला फोनवरुन धमक्या येत असल्याचंही त्यांनी म्हटलं. खरात प्रकरणावरचा चित्रपट करू नका, हा रोल करू नका, असे म्हणत काहीजण थोडसं थांबायला सांगत आहेत. मला राजकीय प्रेशर दिलं जातय, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील असा मला महिला नेत्यांचा फोन आला होता, असे दिपाली सय्यद यांनी म्हटलं.
मला तुम्ही फोन का करताय? राजकीय महिला नेत्या आहेत, त्यांचा रोल मी करते. मी या प्रेशरला घाबरत नाही आणि मी काम करणार आहे. मी माझ्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे, मी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलेन. मी त्यांच्यासमोर हे ओपन करणार आहे की मला या या लोकांचे फोन येत आहेत, असेही दिपाली सय्यद यांनी म्हटलं. मी कलाकार आहे, कोणाची परमिशन घेऊन काम करत नाही. दोन-तीन दिवसांपूर्वीच या सगळ्या चित्रपटा संदर्भात चर्चा सुरू झाली. कालच मला ’महाराष्ट्र एफस्टीन फाईल’ची स्क्रिप्ट मिळाली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कळालं हे असं सगळं प्रकरण आहे. चार महिने मी बिग बॉसमध्ये होते, त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात काय झालं? हे मला माहित नव्हतं, पण बाहेर आल्यानंतर कळलं आहे, असेही दिपाली यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या

Back to top button