रेल्वे ट्रॅक उखडू, विमान उडू देणार नाही

90 लाख मराठे मुंबईत धडकणार

मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा

मुंबई/26 ऑगस्ट : मुंबईत 90 लाख मराठे मुंबईत घुसतील. तुम्ही काय करता ते बघू घेऊ. आम्ही रेल्वे पण फिरू देणार, नाही विमान उडू देणार नाही. सगळ्या रेल्वे पटर्‍या उखडून टाकू. यावेळी मराठे 45 लाख गाडी घेऊन मुंबईत घुसणार आहेत, असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. दक्षिण मुंबईतील मोर्चे आणि आंदोलनांबाबत नवे नियम लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर जरांगे-पाटील आक्रमक झालेत.
यावेळी जरांगे पाटील यांनी मुंबईत भगवं वादळ धडकणारच, असं म्हणत आम्हाला कोण अडवतंय, ते बघतोच, असा इशारा दिलाय. मराठ्यांना आंदोलनापासून रोखण्याचा निर्णय सरकारनं घेणं यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण होतोय. ज्या जनतेनं, ज्या मराठी जनतेनं त्यांना सत्तेत बसवलंय, त्यांना हे सरकार मुंबईत येण्यापासून रोखतंय.
जनतेनं सत्ता दिली, कायदा हातात दिला आणि सरकार त्यांचा उपयोग जनतेच्या विरोधात करतंय. सरकार सत्तेचा गैरवापर करतंय, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय. ज्यांना आपलं म्हणून सत्तेत बसवलंय, आपले फडणवीस, आपले शिंदे म्हणून त्यांना सत्ता दिली, तेच आता आम्हाला मुंबईत येऊ नका असा म्हणत आहेत. सत्ता म्हणजे काय पाच मिनिटे टिकू देणार नाही, अशा गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलाय.
सरकार दादागिरी करत आहे, पण आम्ही त्याला दाद देत नाहीत, त्याला जुमानत आहे. मात्र आम्ही कायदा नक्कीच मानतो, त्यामुळे मुंबईत येणारच. त्यासाठी आधीच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी मागितलीय. आंदोलनाचे परवानगी निवेदन आधीच देण्यात आलंय. जर परवानगी दिली नाही तर तुम्ही कायद्याचा सन्मान करत नाही हे सिद्ध होतं. पण मुंबईत आम्ही येणारच तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ. आमचं ठरलंय, मी जाणार रात्रंदिवस बसणार तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार, तुम्ही मुंबईत कसे अडवतात हे पण बघतो, असा जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला दिलाय.

Back to top button