शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण चिन्हावर आज सुनावनी

सर्वोच्च न्यायालय कुणाला धक्का देणार ठाकरे की शिंदे?

मुंबई /7 ऑक्टोबर : एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी उद्याचा (ता. 8) दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, तर सुप्रीम कोर्टात या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली असून, धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे. सरोदे यांच्या मते, दिनांक 8 ऑक्टोबरला जस्टीस सूर्यकांत सुनावणी करतील अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आहे आणि तरीही आम्हाला न्याय मिळेल, ही आशा अजूनही आहे. राऊत यांनी यासंदर्भात टीका करताना म्हटले की, आपली न्यायव्यवस्था प्रतिष्ठा गमावून बसली आहे कारण शिवसेना गेल्या चार वर्षांपासून न्यायासाठी झगडते आहे, कायदेशीर लढाई करत आहे, तरीही तारीख पे तारीख मिळत नाही आणि न्याय मिळत नाही; याआधीचे सर्व न्यायाधीश जोडे खाण्याच्या लायकीचे होते, अशी देखील त्यांनी टीका केली.

संबंधित बातम्या

Back to top button