ओवेसींच्या बालेकिल्ल्यात नवनीत राणांची गर्जना

देशात शिवरायांचा भगवा व डॉ.बाबासाहेबांचा निळाच चालणार

तेलंगणात भाजप विजयाचा निर्धार

तेलंगणा  / 8 फेब्रुवारी : तेलंगणा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अमरावतीच्या आक्रमक नेत्या नवनीत रवि राणा यांनी प्रचाराचा धडाका लावला असून, त्यांच्या उपस्थितीत निघालेल्या भव्य जनसमुदायाने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बासर येथील श्री ज्ञान सरस्वती देवीचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. भैंसा, खानापूर, नारायणपेठ आणि मक्तल येथील रोड शोमध्ये तरुणाईसह महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. देशात फक्त शिवरायांचा भगवा आणि डॉ. बाबासाहेबांचा निळाच चालणार असा ठाम इशारा देत त्यांनी काँग्रेस आणि एमआयएमवर जोरदार प्रहार केला. ओवेसींचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असा विश्वास देत त्यांनी तेलंगणात परिवर्तनाचे आवाहन केले. या ऐतिहासिक सभेत तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्ष एन. रामाचंद्र राव, उपाध्यक्ष श्रीमती कोळी माधवी, तेलंगणा प्रभारी आमदार आशिष शेलार, सचिव डॉ. एन. गौतम राव, जिल्हाध्यक्ष रितेश राठोड, आमदार पवार रामाराव पाटील आणि माजी आमदार सुमनबाई राठोड उपस्थित होत्या. मोदीजींच्या विकास संकल्पाला साथ देण्यासाठी भाजपचाच झेंडा फडकवा, असे आवाहन राणा यांनी केले. यावेळी अमोल सोनकांबळे, चिंता पांडू रजिता, गाडे रेश्मा बाई, चिरला सुभाष, तोटा सुजाता, दगडे श्रीकांत, शिंदे कपिल, बेहाती प्रीतम, कांडली राधा, निमालावर प्रवीण, अलेम लक्ष्मी आणि अनुपोथला मलेश या उमेदवारांना त्यांनी विजयाचा मंत्र दिला.

विकासाचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास संकल्प हा केवळ शब्द नसून उज्ज्वल भविष्याचा ठाम निर्धार आहे. तेलंगणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काँग्रेस आणि ओवेसी यांना हद्दपार करून कमळ फुलवण्याचे आवाहन नवनीत राणा यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या

Back to top button