सीझरनंतर पोटातच सोडले हातमोजे

बीड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

बीड /18 ऑगस्ट : बीड जिल्हा रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय संध्या सूरज गायकवाड या नवमातेची सीझर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद राहिल्याने त्यांना गंभीर त्रास झाला. सध्या संध्या यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरमार्गदर्शक आणि स्थानिक माहिती मिळवणे
संध्या गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. चार दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तिथे सोनोग्राफीसह काही वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांच्या पोटात काहीतरी वस्तू असल्याचे निदर्शनास आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर संध्या यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान संध्या यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद बाहेर काढण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही प्रश्न उपस्थित होत आहेत

संबंधित बातम्या

Back to top button