जलजीवनच्या कामांसाठी 31 हजार कोटींच्या निधीची गरज

मुंबई : वर्षाला 700 कोटी रुपये खर्च करण्याची सवय अस लेल्या विभागा वर अचानक हजारो कोटींच्या कामां चा भार पडला. 10 किलो वजन उचलायची सवय असलेल्याला 100 किलोचा भार दिल्यावर जी अवस्था होते, तीच आमची झाली, अशी कबुली देत, रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी सुमारे 31 हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. विधानसभेत जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवरून सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी निधीच्या निकडीवर भाष्य केले. योजना रखडण्याला केवळ प्रशासन जबाबदार नसल्याचे सांगत मंत्र्यांनी आमदारांनाही टोला लगावला.




