उत्तराखंडच्या राज्यपालांच्या हेलिकॉप्टरचं आपातकालीन लँडिंग

मुंबई-उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच आज उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टिनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे सिंग यांच्या हेलिकॉप्टरला आणीबाणीच्या परिस्थितीत पौडी गढवालमधील श्रीनगर येथे उतवावं लागलं. पोलिसांनी दिलेला माहितीनुसार हवेत उड्डाण करत असतानाच या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिग करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रसंगावधान राखत निर्णय घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर या हेलिकॉप्टरला श्रीनगर गढवालमधील जीव्हीके हेलिपॅडवर उतरवण्यात आले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button