सिंधुदुर्गमध्ये आठ पर्यटक बुडाले; तीन जणांचा मृत्यू
बेपत्ता 5 जणांचा शोध सुरु

मुंबई/3 ऑक्टोबर – जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले असून तिघांना वाचवण्यात यश आले आहे, तर उर्वरित दोन पर्यटकांचा शोध सुरु आहे. बुडालेले सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचे शोधकार्य सुरु असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आलेल्या आठ जणांपैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, तीन जणांचे मृतदेह सापडले असून दोन जणांचा शोध सुरूच आहे. प्राथमिक माहितीनुसार काही पर्यटक कुडाळचे तर काही बेळगाव येथील असल्याचे समजते.




