धनंजय मुंडेंना चौकशीला आणा

वडीगोद्री : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वर झालेल्या संभाव्य घात पाताच्या कटाचे गांभीर्य आता राजकीय वर्तुळात वाढले आहे. ज्या कांचन साळवेचे नाव जरांगे पाटलांनी हत्येच्या कटात घेतले होते, त्याला जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर बोलताना जरांगे पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आणि धनंजय मुंडेंना चौकशीला आणण्याची मागणी करत एक अंतिम इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणाचे गांभीर्य वारंवार अधोरेखित केले आहे. जरांगे पाटील म्हणाले, हे प्रकरण खूप मोठं आहे, हा लहान विषय नाही, चेष्टेवरती सहज घेण्याचा विषय नाहीये. सामूहिक कट रचला गेला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button