मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी महापालिकेत भाजपा रेकॉर्ड करणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. साटम यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित साटम आमदार आहेत, 3-4 वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. विधानसभेत अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. मुंबईतल्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जी कल्पकता हवी ती त्यांच्यात आहेत. निश्चितपणे अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबईत विजयाची घौडदौड राखेल.

संबंधित बातम्या

Back to top button