जालन्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या

जालना : जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यात गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. आज साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींकडून गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये चरण रायमल या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरामध्ये दुचाकी वर आलेल्या अज्ञात आरोपींनी गोळीबार केला ज्यात चरण रायमल या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल.

संबंधित बातम्या

Back to top button