मद्यप्रेमींना झटका : राज्यांत दारू महागली

मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

* राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींचा महसूल वाढणार

मुंबई /10 जून: राज्याजतील मद्यप्रेमींसाठी महत्वाजची बातमी असून राज्या सरकाने मद्यावरील उत्पाादन शुल्कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यारतील तिजोरील या निर्णयामुळे 14 हजार कोटीच्या महसूलाची वाढ होणार आहे. पण त्याघचवेळी मद्यप्रेमींच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. आज झालेल्या राज्य्मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्याण प्रमूख निर्णयामध्ये शासनाचा महसूल वाढवण्यासाठी उत्पायदन शुल्का विभागाने मद्यावरील शुल्कत वाढविले आहे. यामध्ये भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्याने वाढ करण्यात आली आहे. आता यापुढे 180 मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमतीत प्रत्ये्क ब्रँडनुसार वेगळी होणार आहे. यामध्ये देशी मद्य- 80 रुपये होणार आहे तर महाराष्ट्रात तयार होणारे लिकर – 148 रुपये, तसेच भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – 205 रुपये, विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड-360 रुपये अशी किमान विक्री किंमत राहणार आहे. यामध्ये प्रत्ये्क ब्रँडनुसार किंमतीमध्ये फरक पडणार आहे. मद्याच्या किंमतीबरोबर उत्पा दन वाढवण्यासाठी सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पद नव्याने भरण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासह राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्याकमुळे आता मद्यप्रेमींनी मद्य विकत घेताना अधिकचे पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button