सरकार चर्चेला का घाबरत आहे?

परराष्ट्र धोरणावर विरोधकांची चर्चेची मागणी

* गॅस दरावरुन संसदे बाहेर जोरदार घोषणाबाजी

नवी दिल्ली/9 मार्च – अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धावर भारत सरकारने भूमिका स्पष्ट करावी यासाठी विरोधी पक्षाने संसदेच्या बाहेर जोरदार आंदोलन केले. आखातात आगडोंब उसळला, तेलाच्या किंमती भडकल्या, या काळात भारतातून शांतता नाही तर नेतृत्त्वाची गरज आहे असे बॅनर झळकावत विरोधकांनी संसदेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आंदोलन केले. संसदेच्या दोन्ही सभागृहात युद्धावर चर्चेची मागणी करण्यात आली. इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा-इंधन संकट, अमेरिकेकडून येत असलेले निर्देश यावर विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणी केली, यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकसभा दोन वेळा तहकूब करण्यात आली, तर राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग केला. काँग्रेसने लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी नोटीस दिली, आज त्यांनी दुसरी नोटीस दिली. इराण युद्धावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत माहिती देण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या

Back to top button