तुमचे रक्त केवळ कॅमेर्‍यासमोरच का उसळते?

नवी दिल्ली/ 22 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर काँग्रेसने टीका केली आहे. तर राहुल गांधी यांनी उगाच पोकळ भाषणे देऊ नका असे सांगत तीन प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी म्हणतात, तुम्ही केवळ या तीन प्रश्नांची उत्तरे द्या. दहशतवादाबाबत तुम्ही पाकिस्तानवर विश्वास का ठेवलात?, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत भारतीयांच्या हिताचा बळी का दिला?, तुमचे रक्त केवळ कॅमेर्‍यासमोरच का उसळते? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button