सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी

*  AAIB अहवालावर व्यक्त केली नाराजी

* चौकशीबाबतचे उत्तर मागितले

नवी दिल्ली/22 सप्टेंबर  : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर 171 विमानाचा मोठा अपघात झाला होता. दुपारी 1.40 वाजता अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेले हे विमान अवघ्या तीन मिनिटांत कोसळले. या घटनेत विमानातून प्रवास करणार्‍या प्रवाशांसोबतच ज्या भागात हे विमान कोसळले तेथील लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण 275 लोकांनी आपला जीव गमावला, आणि केवळ विमानातील एकच व्यक्ती या अपघातात वाचली. याच प्रकरणी सोमवारी, दिनांक 22 सप्टेंबर, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली, ज्यामध्ये न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच, न्यायालयाकडून AAIB अहवालावरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अहमदाबाद विमान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात विमान अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटेेशर सिंह यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने एएआयबीच्या प्राथमिक तपासाला ‘बेजबाबदार’ म्हटले. विमान अपघाताचे कारण स्पष्ट न करणार्‍या अहवालात थेटपणे वैमानिकाची चूक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे, आणि याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत अपघात दुर्दैवी असल्याचे म्हटले. एएआयबीने त्यांच्या अहवालात फ्यूल कट ऑफमुळे विमान कोसळल्याचा संशय व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या

Back to top button