सुप्रीम कोर्टाचा बॅनर्जी सरकारला धक्का

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं ईडीला दिलासा दिला आहे. पश्चिम बंगालच्या पोलि सांनी ईडी अधि कार्यां विरोधात दाखल केलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षासाठी काम करणार्या आयपॅक संस्थेच्या कार्यालयावर ईडीनं छापेमारी केली होती. त्या विरोधात पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडीच्या अधिकार्यांवर एफआयआर दाखल केली होती. ईडीनं या प्रकरणी सुरुवातीला कोलकाता हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी सुनावणी घेत ईडीला दिलासा दिला. तर, पश्चिम बंगालचं सरकार यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करु शकत नाही.




