सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
राज्यसभेची ऑफर नाकारली

राज्याच्या राजकारणातच कार्यरत राहणार
बंगळूरु/28 मे: मी सक्रिय राजकारणातच कार्यरत राहीन. मला राष्ट्रीय राजकारणात कोणताही रस नाही. मला राज्यसभेबद्दलही विचारणा करण्यात आली होती; पण मी ती नाकारली आहे. मला कर्नाटकच्या राजकारणातच राहायचे आहे, असे स्पाष्ट मुख्यणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याजनंतर सिद्धरामय्यांनी स्प्ष्टत केले. बेंगळुरू येथील लोकभवन येथे आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यायन, आज (दि. 28) मुख्यामंत्रीपदाचा राजीनामा सादर करताना त्यांहच्यातसोबत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते. काँग्रेस पक्षाची आश्वासने पूर्ण करून आपण दिलेला शब्द पाळला असे सांगत मुख्यतमंत्रीपदाचा राजीनामा दिल्योनंतर सिद्धरामय्या भावूक झाले. ते म्हणाले की, विरोधकांकडून सातत्याने होणार्या टीकेला तोंड देत सरकारने बहुतांश आश्वासनांची पूर्तता केली आहे.




