जनगणनेत ‘लिव्ह इन’ जोडप्यांची नोंद ‘विवाहित’
2027 च्या जनगणनेत मोठा बदल, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली/30 मार्च -केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या जोडप्यांची गणना देखील ‘विवाहित‘ म्हणून केली जाणार आहे. या निर्णयामुळे देशातील सामाजिक आकडेवारी संकलित करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे.
2027 च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमावलीत लिव्ह इन जोडप्यांना वेगळ्या श्रेणीत न ठेवता त्यांना विवाहित जोडप्यांच्या समकक्ष मानले जाईल. आतापर्यंत जनगणनेमध्ये केवळ कायदेशीररित्या विवाहित लोकांचीच नोंद विवाहित म्हणून केली जात असे. मात्र, बदलत्या सामाजिक स्थितीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे. 2027 लशर्पीीी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यामागे तीन महत्त्वाचे उद्देश आहेत. पहिला महत्त्वाचा उद्देश म्हणजे सामाजिक सुरक्षा. लिव्ह इन मध्ये राहणार्या महिला आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना अधिकृत ओळख देण्यासाठी हा बदल उपयुक्त ठरेल. दुसरा उद्देश असा की, देशात लिव्ह इनमध्ये राहणार्यांची संख्या मोठी आहे. त्यांची नोंद विवाहितांमध्ये केल्यास लोकसंख्या आणि कौटुंबिक स्थितीची अधिक अचूक आकडेवारी सरकारकडे उपलब्ध होईल. सर्वात महत्त्वाचा तिसरा उद्देश म्हणून खुद्द सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये प्रदीर्घ काळ लिव्ह इनमध्ये राहणार्या जोडप्यांना विवाहासारखेच अधिकार देण्याचे निर्देश दिले आहेत.




