’रेलवन’ अॅपद्वारे तिकीट बुकिंगवर मिळणार 3 टक्के सवलत!
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली/31 डिसेंबर : डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत ’रेलवन’ (ठरळश्रजपश) पद्वारे अनारक्षित (णपीशीर्शीींशव) तिकीट बुक करणार्या प्रवाशांना तिकिटाच्या दरात 3 टक्के सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही डिजिटल पेमेंट माध्यमाचा वापर करून हा लाभ घेता येईल.
डिजिटल बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 30 डिसेंबर 2025 रोजी ’सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम’ला पत्र लिहून सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात नमूद केल्यानुसार, डिजिटल बुकिंगचा वापर वाढवण्यासाठी ’रेलवन’ पवर सर्व डिजिटल पेमेंट पर्यायांवर 3 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिजिटल बुकिंगचा प्रसार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, 14 जानेवारी 2026 पासून सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंट मोडवर ही 3 टक्के सवलत लागू होईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.या योजनेचा आढावा घेण्यासाठी ’क्रिस’ मे महिन्यात आपला अहवाल सादर करेल, ज्यावर पुढील निर्णय अवलंबून असेल.




