देशभरात गॅसचा तुटवडा, एस्मा लागू

काळाबाजार-साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली/10 मार्च – भारतात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, हरियाणा, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशमध्ये व्यवसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. यामुळे या राज्यांमधील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे.
मध्यपूर्वे आशियातील वाढत्या तणावामुळे भारतात येणारे एलपीजी शिपमेंट येण्यास उशिर होत आहे. त्यामुळे देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने आजपासून, मंगळवार देशात ‘अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा 1955’ अर्थात ‘एस्मा’ लागू करण्यात आला आहे. गॅस सिलिंडरची साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने एस्मा लागू केला आहे. अमेरिका-इस्त्रायल यांचे इराणविरुद्धच्या युद्धाचा आज 11 वा दिवस. भारतावर याचा मोठा परिणाम जाणवत आहे. भारत सरकारने पेट्रोलियम आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि नॅच्युरल गॅसची उपलब्धता, पुरवठा आणि योग्य वितरण करण्यासाठी एसेंशियल कमोडिटीज हा 1955 चा कायदा लागू केला आहे.
9,000 रेस्टॉरंट्स आणि बार बंद पडण्याची वेळ-महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा आहे. पुण्यातील स्थिती एवढी वाईट आहे की महापालिकेने गॅसवर चालणार्‍या शवदाहिनी तात्पुरत्या बंद केल्या आहेत. राज्यातील जवळपास 9,000 रेस्टॉरंट्स आणि बार बंद पडण्याची वेळ आली आहे. अशीच स्थिती मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, आंध्रप्रदेश आणि तेलंगानातील आहे.

घरगुती सिलिंडरची बुकींग आता 25 दिवसांनी

केंद्र सरकारने घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या रिफिल बुकींगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांना आता एका सिलिंडरची डिलिव्हरी झाल्यानंतर दुसरे सिलिंडर 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनी बुक करता येणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button