विमानतळाच्या उद्घाटनावेळी फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

आज स्वप्नपूर्तीचा दिवस; नवी मुंबई

नवी मुंबई/8 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील नागरिकांना या विमानतळाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा होती आणि बुधवारी (ता. 8 ऑक्टोबर) पंतप्रधान मोदींनी ते उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते. विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणातून पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याचे सांगितले. या विमानतळाची संकल्पना 1990 च्या दशकातील होती, परंतु मोदींच्या सरकारनंतर ही संकल्पना पूर्ण झाली, असे ते म्हणाले आणि विरोधकांना टोला लगावला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले असून, विमानतळाची उभारणी चार टप्प्यांमध्ये होणार आहे. प्रवासी व कार्गो वाहतूक सुरू होण्यास सुमारे दोन महिने लागू शकतात, परंतु उद्घाटनाच्या दिवशी फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांत मोदींच्या नेतृत्वात अनेक प्रकल्प प्रत्यक्षात आले आहेत आणि हे विमानतळ नव भारताचे प्रतीक आहे. त्यांनी विरोधकांना स्मरण करून दिले की, जेव्हा मुंबई–पुणे प्रवास करताना केवळ बोर्ड दिसायचा पण काही काम सुरू नव्हते. मोदींच्या प्रगतीतर्फे विमानतळास आवश्यक 8 एनओसी 10 वर्षांमध्ये मिळाली नव्हती, पण त्यांच्या एका बैठकेत ते सहज मिळाले आणि निर्माण सुरू झाले. हे विमानतळ इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून नदी बदलावी लागली, डोंगर कापावे लागले आणि आता 9 कोटी प्रवासी हँडल करण्यास सक्षम आहे. हे विमानतळ फक्त प्रवाशांसाठी नाही तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button