दिल्लीत मोठा गदारोळ; धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा मोदींच्या निवासस्थानी ठिय्या

राहुल गांधींच्या नाकातून रक्तस्त्राव

राहुल गांधींची तीन तासानंतर पोलिसांकडून सुटका

पोलिसांनी ताब्यात घेताना मार लागल्याचा आरोप

प्रियंका गांधीसह अनेक नेते ताब्यात काँग्रेस खासदारांची धरपकड

नवी दिल्ली/21 ; जुलै नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सध्या दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पोर्शभूमीवर आज काँग्रेस आणि विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी, विरोधक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचेही दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेताना दुखापत पोहोचवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे पंतप्रधान निवासाबाहेर लोकसोभेतील विरधीपक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच सपा प्रमुख खासदार अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते आंदोलनाला बसले होते. सायंकाळी साधारणपणे साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला आणि पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला. यानंतर, साधारणपणे 10 हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांनी राहुल गांधी यांना बळाचा वापर करून उचलले आणि पोलीस व्हॅनमध्ये बसवले. यावेळी राहुल गांधी यांनी पोलिसींना जबरदस्त विरोध केला. दरम्यान त्यांच्या नाकातून रक्त्राव होतानाही दिसू आला. तसेच, झाटापटीत राहुल गांधी यांच्या नाकाला आणि छातीला दुखापत झाल्याचाही आरोप आहे.

संबंधित बातम्या

Back to top button