दर्यापुरात ‘शिवछत्रपती’ शंकरपटाचा थरार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त

* गरजू महिलांना सिलाई मशीन तर दिव्यांगांना सायकलींचे वाटप
* गोपाळ पाटील अरबट यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रम

दर्यापूर / 10 फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दर्यापूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ पाटील अरबट यांच्या वतीने भव्य ’शिवछत्रपति शंकरपट’ आणि महाआरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सिलाई मशीन आणि दिव्यांग बांधवांना फिरते राहण्यासाठी सायकलींचे वाटप करून एक सामाजिक आदर्श जपला गेला. महाराष्ट्राची संस्कृती असलेला शंकरपट आणि जनसेवेचा हा संगम दर्यापूरकरांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांच्या पूजनाने व माल्यार्पणाने झाली. यानंतर शिवसेना उपनेत्या प्रीती बंड, माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाप्रमुख सुनील डीके, दर्यापूर बाजार समितीचे उपसभापती राजू कराले यांच्या हस्ते शंकरपटाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, आयोजक गोपाळ पाटील अरबट यांनी स्वतः बैलगाडी हाकत या खेळाचा आनंद द्विगुणित केला. पुण्याची प्रसिद्ध कलावंत मानसी पुणेकर हिच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.या सोहळ्याला अंजनगावचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले, सुनील राणा, नगरसेवक रोशन कट्यारमल, डॉ. इकबाल पठाण, गोकुळदास , जिल्हा शिक्षक बँक अध्यक्ष सुनील केणे, सरपंच अमोल कोरडे, सरपंच विजय मोहोड, सरपंच विजय अढाऊ, सरपंच अ. सिद्दिक अ शब्बीर, सरपंच सुनीता धोटे, उपजिल्हाप्रमुख बाबूराव उंबरकर, तालुकाप्रमुख गणेश लाजूरकर, नितीन चौखडे, मुन्ना इसोकार, तुषार चौधरी, महेंद्र भांडे, अतुल सगने, गणेश गावंडे, सुरेश टाले, गजानन चांदुरकर, योगेश बुंदे, योगेश मापारी, बबनराव विल्हेकर, शरद आठवले, प्रशांत चांदुरकर, अमोल अरबट, केशवराव अरबट, अभिजीत टाले, पुरुषोत्तम अरबट, विठ्ठल अरबट, बळीराम सेजे, ज्ञानेश्वर अरबट, विनोद पवार, विजय तलोकार, विनायक मोहोड, शेखर गावंडे, सोपान अरबट, जगनाथ सपकाळ, गजानन वडूरकर, साहेबराव सावरकर, गणेश घोगरे, गजानन पुरी, प्रवीण राऊत, नंदकिशोर अरबट, नागेश कांबे, गोपाळ टाक, निलेश गावंडे, विनय गावंडे, नागोराव केणे, शरद अरबट, चेतन अरबट, कपिल देवके, नामदेवराव अरबट, निलेश टाले, अमोल कोरडे, राहुल भुंबर, सागर गेठे, हेमंत उमाले, भूषण नागे, वैभव भांडे, नीरज नागे, अमित ठाकरे आणि सुभाष घुटे यांसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजसेवेचा वसा आणि सांस्कृतिक वारसा

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्त केवळ उत्सव न साजरा करता, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न अरबट यांनी केला आहे. सिलाई मशीन आणि सायकलींच्या मदतीने अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली असून, शंकरपटाच्या माध्यमातून ग्रामीण खेळाचे जतन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button