मोर्शी आगारात वाटर कुलर व शवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न

श्रीमती रुखमाबाई रामचंद्रजी साबू व साबू परिवार यांच्यातर्फे

महेश नवमी निमित्त सामाजिक उपक्रम

मोर्शी /4 जून: समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो ही भूमिका घेऊन अनेक नागरीक समाजात कार्य करीत असतात. आपले सुद्धा समाजाला देणे लागते या विचाराने प्रेरीत होऊन येरला येथील श्रीमती रुखमाबाई रामचंद्रजी साबू व साबु परिवार यांच्यातर्फे मोर्शीमध्ये येणार्‍या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी आरओ लावलेले वाटर कुलर मोर्शी आगारात भेट दिले. तसेच स्व.ओमप्रकाश लक्ष्मीनारायणजी साबू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोहनकुमार व हेमंतकुमार साबू यांच्या कडून मोर्शी परिसराकरिता शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली.
नोकरी कामी बाहेरगावी गेलेले व घरी असलेले जेष्ठ नागरिक यांची अचानक घडलेली घटना आणि बाहेरून येण्यासाठी लागणारा वेळ तोपर्यंत मृतदेहाची होणारी स्थिती लक्षात घेता नातेवाईकांना मृतकाचे अंत्यदर्शन सुस्थितीत व्हावे यासाठी शवपेटीची स्थानिक पातळीवर गरज होती. ही बाब हेरून मोहन कुमार व हेमंतकुमार साबु यांनी ही शवपेटी दिली.तसेच मोर्शी शहरात विविध कामासाठी हजारो नागरिक एसटीच्या माध्यमातून मोर्शीमध्ये येतात.मोर्शीमध्ये येणार्‍या नागरिकांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे या उद्देशाने श्रीमती रुखमाबाई रामचंद्र साबू तसेच साबू परिवारातर्फे बस स्थानक येथे वॉटर कुलर देण्यात आला. या वाटर कुलरचा लोकार्पण सोहळा महेश नवमीचे औचित्य साधून दि.4 जूनला संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन येरला येथील श्रीमती रुखमाबाई रामचंद्रजी साबू यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी श्रीमती रुखमाबाई साबू, मोर्शी आगारप्रमुख आशाताई वासनिक,सतिश भगत, डॉ.संतोष राठी,दिलीप अग्रवाल, नंदकिशोरजी साबू,रमेश बंग, चंद्रप्रकाश साबू, डॉ.शाम राठी,नवल अग्रवाल, निखिल ओझा, हेमंतकुमार साबू, हितेशकुमार साबू, अजय साबू,महेश सोनी,घनश्याम गट्टानी, सुरेश गांधी,सतिश गट्टानी,मंगेश साबू, शेखर चौधरी,संजय उल्हे, शरद कनेर,अजय पाटिल, नंदुभाऊ नानोटकर,नितिन उमाळे, विनोद सोनटक्के,राजेश बड़ासे, मधुसूदन बियाणी, सुनिल कोहळे, नीरज वसंत,प्रतीक वसंत, साकेत खटोले,सुमीत अग्रवाल, बाबाराव जाधव, ज्योतिप्रसाद मालवीय, निकेश ठाकुर, दीनू धुर्वे, राजु श्रीराव,विलास डोळस,विजय वाघाडे तसेच इतर नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन निखिल ओझा यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button