बडनेरा येथील फिशरी हबमध्ये सुनिल राणा यांच्या हस्ते वृक्षारोपण
वृक्षारोपण, स्वच्छता कार्यक्रमाद्वारे फिशरीज हब परिसरात जागतिक पर्यावरण दिन साजरा

अमरावती /5 जून: माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जागतिक पर्यावरण दिना निमित्त दिनांक 5 जुन,2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन फिशरीज हब, बडनेरा येथे करण्यात आले. यावेळी शहरातील पदाधिकारी सुनिल राणा यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन सदर वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, दिपीका गायकवाड, धनंजय शिंदे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, उपअभियंता (प्रकल्प) सुहास चव्हाण, उपअभियंता नितीन बोबडे, आशिष अवसरे, विवेक देशमुख, जयंत काळमेघ, शरद तिनखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर परिसरात नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोपे जगविण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला. जागतिक पर्यावरण दिना निमित्त उपस्थितांनी स्वच्छ भारत हरित भारत हरित प्रतिज्ञा घेतली. महानगरपालिकेच्या वतीने 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन व्यापक प्रमाणात लोकसहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करत साजरा करण्यात आला. आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन विद्यार्थी, महिला, युवक, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच निसर्गप्रेमी अमरावतीकर नागरिकांनी वृक्षारोपण आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अमरावती महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने शहराच्या वृक्षसंवर्धनासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने फळेफुले देणार्या आणि पक्ष्यांना आकर्षित करणार्या आणि त्याद्वारे अमरावती शहराच्या जैवविविधतेत भर घालणार्या स्थानिक देशी प्रजातींच्या वृक्षांचीच लागवड करण्यात येत आहे. या मोहीमेत मनपा अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार, कंत्राटदार, बिटप्यून, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.