मनपा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांचे समवेत नाले सफाई चे कामाचे स्थळाचे निरीक्षण

महानगरपालिका अतिक्रमण विभागाद्वारे

अमरावती /20 मे: अमरावती शहरातील मुख्य मोठे नाले 18 व लहान नाले 22 आहेत. सध्या पावसाळ्यापुर्वी नाले सफाईचे कामे सुरु करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापुर्वी नाले सफाईचे कामे मार्च महिन्यापासुन जेसीबी / पोकलेन मशीनद्वारे सुरु करण्यात आली आहे. आज दि.20/05/2025 रोजी काँग्रेस नगर, ऑक्सिजन पार्क, कमल प्लाझा, दस्तूरनगर, श्री अंबादेवी परिसर नाला, एच.व्ही.पी.एम. व बडनेरा येथील तिलक नगर, माताफेल्ल नगर परिसर येथील सुरू असलेले नाले सफाईचे कामे पाहण्याकरीता महानगरपालिका उपायुक्त (प्रशा.) डॉ.मेघना वासनकर, नियंत्रण अधिकारी डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, कनिष्ठ लिपिक शुभम पांडे उपस्थित होते.
नालेसफाई चे कामे पावसाळापूर्वी पूर्ण करणे बाबतचे निर्देश महानगरपालिका उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी दिले. उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी अतिक्रमण विभागाला सक्त निर्देश दिले की, पावसाळापूर्वी शहरातील सर्व नाले साफ झाले पाहिजे. नाल्यातला गाळ त्वरीत उचलून घ्यावे. तसेच सर्व लहान मोठ्या नाल्यांची रोजची साफ सफाईची माहिती देण्यात यावी. तसेच वेळ पडल्यास पोकलँन्ड व जेसीपी वाढविण्याबाबत सक्त निर्देश देण्यात आले. सर्व प्रभागातील स्वास्थ निरीक्षकांकडुन व कंत्राटदाराकडुन सर्व नाल्याची यादी तयार करुन त्या नाल्याची साफ सफाई करण्याबाबत निर्देश दिले.
उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी यावेळी व्यापारी वर्ग व नागरीकांना आवाहन केले की, त्यांनी नाल्यात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये. नाल्यात कचरा टाकल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होवून पुर परिस्थिती निर्माण होवू शकतो. नागरीकांनी नाल्यात कचरा स्वतःहा टाकू नये व इतरही कोणाला टाकू देवू नये.

संबंधित बातम्या

Back to top button