श्री हव्याप्र मंडळाच्या रक्तदान शिबिराला मित्र मंडळाची उपस्थिती

अमरावती /28 मे: पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या 94 व्या वाढदिवसानिमित्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व समस्त अमरावतीकर मंडळी प्रचंड उत्साह होता. माजी विद्यार्थ्यांपासून तर सर्व सामान्य नागरिकांपर्यंत ताऊंची भेट आशीर्वाद शुभेच्छा अभिष्टचिंतन इत्यादी दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळी हजेरी होती. वाढदिवसाच्या एक दिवस आधी कौन्सिलिंग हॉल येथे आयोजित रक्तदान शबिराला डॉ. गोविंद कासट मित्र मंडळींना भेट दिली.
शंभरहून अधिक युनिट रक्त संकलन झालेल्या या शिबिरास भेट व रक्तदात्यांचे अभिनंदन संस्थेचे माजी अध्यक्ष व पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे अनुयायी डॉ. गोविंद कासट यांनी भेट दिली. यावेळी प्रा. रवींद्र खांडेकर महेंद्र भुतडा प्रा. दलाल डॉ. संजय तिरथकर आशिष हटेकर प्रा. शहाणे इत्यादी मंडळी होती. स्वतः डॉ. गोविंद कासट यांनी 51 वेळा रक्तदान केले आहे. त्यामागील काही वेळी श्री हव्याप्र मंडळाचे रक्तदान शिबिरात रक्तदान केले. व्यायाम शाळेतील मोठ्या संख्येतील विद्यार्थी आयुष्यात पहिल्यांदा मंडळाद्वारे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करतात व तेथून त्यांची रक्तदानाची वाटचाल सुरू होते हे उल्लेखनीय.

संबंधित बातम्या

Back to top button