सुरक्षा भिंती नसल्याने नाला खचला

45 वर्षापासूनचा नागरिकांचा येण्या-जाण्याचा पन्नालालनगर रस्ता बंद झाला

-वेळ पडल्यास आंदोलनाचा इशारा
अमरावती /20 मे:- स्थानिक पन्नालालनगर मोठ्या नाल्याला सुरक्षा भिंती नसल्याने खचला असून नागरिकांचा 45 वर्षापासून असलेला येण्या – जाण्याचा रस्ता बंद झाला आहे शेकडो नागरीक महिला , जेष्ठ नागरीक , युवक यांना येण्या – जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे .हा रस्ता नाल्याच्या बाजूने पूर्ण खचला असून मोठे खड्डे त्याला पडले आहे त्यामुळे रस्ता केव्हाही खाली येवून पडू शकतो आणी एखादी मोठी दुर्घटना होउन जीवितहानी होण्याची शक्यता आहे . नाल्याच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठील नागरिकांना अक्षरश्या जीव मुठीत घेऊन राहावे लागते . काही महिन्यापूर्वी माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी नाल्यात उतरून आक्रमक आंदोलन केले होते आणि सातत्याने आक्रमक पाठपुरावा केल्यामुळे मनपाने पन्नालालनगर येथील चंदू सोजतीया यांच्या घरापासून ते पप्पू गहलोद यांच्या घरापर्यंत सुरक्षा भिंत बांधली पन पप्पू गहलोत ते रवी शेंडे यांच्या घरापर्यंत खचलेला नाला दुरुस्त केला नाही त्यामुळे अनियंत्रित झालेला साहित्याने भरलेला लोडेड ट्रक नाल्यात कोसळला आणी पन्नालालनगर रस्ता पुन्हा बंद झाला मिलिंद बांबल स्थायी समिती सभापती असतांना ( सन :- 2016-17) शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनीसुरक्षा भिंती बांधण्यात याव्या यासाठी आमसभेत आणी स्थायी समितीमध्ये ठराव पारित करून शहरातील 16 मोठेनाले आणी 18 उपनाले यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यासाठी पुण्याच्या युनिटी कंसल्टंट कंपनीने 375 करोड 80 लक्ष रुपयाचा ऊझठ ( डि.पी.आर ) तयार केला होता पन त्यानंतर त्यावर काही कार्यवाही मनपाने केली नाही . सुरक्षा भिंती नसल्याने नाला दोन्ही बाजूंनी खचत चालला आहे त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे काही दिवसा अगोदर नाला खचल्यामुळे पन्नालालबगीच्या येथील पवन बागडी , रामेश्वर रौरासे ,प्रेमलता राठी तर गरीबनगर येथील पंचफुलाबाई इंगोले यांच्या घरमागील भिंती ( वॉल कंपाउंड )नाल्या खचल्यामुळे पडल्या आहे त्यांना सुध्दा काहीच मदत मिळाली नाही त्यांना सर्वांना मदत करण्यात यावी त्याचप्रमाणे नुकत्याच पन्नालालनगर येथील पप्पू गहलोद यांच्या घरापासून ते रवी शेंडे यांच्या घरापर्यन्त नाला खचल्यामुळे नागरिकांचा पन्नालालनगर रस्ता बंद झाला आहे .तरी तातडीने पन्नालालनगर येथील पप्पू गहलोद ते रवी शेंडे यांच्या घरापर्यंत नाल्याला सुरक्षा भिंत बांधून नागरिकांचा येण्या- जाण्याचा पन्नालालनगर रस्ता सुरू करण्यात यावा या मागणीसाठी मिलिंद बांबल यांनी आक्रमक पवित्रा घेतलानंतर गहलोत ते रवी शेंडे यांच्या घरापर्यंत नाल्याला सुरक्षा भिंत बांधण्यासाठी 49 लाख 80 हजार रुपये मंजूर केले पन अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही तरी या कामाला प्राधान्याने सुरुवात करावी अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा आवारात आमरण उपोषण वेळ पडल्यास आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा माजी स्थायी समिती सभापती आणी संघर्ष युवक संघटनेचे संस्थापक मिलिंद बांबल यांनी मनपा आयुक्त सचिनजी कलंत्रे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

संबंधित बातम्या

Back to top button