मत पत्रिका फाटली तर, अवैध ठरवू नका

निवडणूक प्रक्रियेवर सुधीर मुनगंटीवारांचा संताप

चंद्रपूर /23 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बॅलेट बॉक्समध्ये मतपत्रिका सहज जात नसलेचं सांगत निवडणुकीच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे. आचारसंहितेमुळे दुष्काळी प्रश्नांवर बैठक घेऊ न देणार्‍या निवडणूक आयुक्तांनी 38 उमेदवार असलेली ही मतपत्रिका घडी केल्यावर जाडी होते. इतकी जाड घडी असलेली मतपत्रिका बॅलेट बॉक्स मधील छोट्या छिद्रातून कशी भरली जाईल? याबाबत कुठलाही विचार न केल्याचे सांगत सुधीर मुनगंटीवारांनी आपला संताप व्यक्त केलाय.
दरम्यान, आता कुठलीही मतपत्रिका डब्यात भरताना फाटल्याने ती अवैध ठरवू नका, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. चंद्रपूर शहरातील एफईएस कॉलेजमध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदान केले. यंदा भाजपचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपच्या विकासकामांना साथ देतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Back to top button