मुंबईतील सेलिब्रिटींना धमक्यांचा ‘सिलसिला

महापौर कार्यालयासह बिग बिंना उडवून देण्याचा मेल

पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्था वाढवली

मुंबई /23 ऑक्टोबर  : राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी सत्ताधार्‍यांना घेरले आहे. अशातच आता राज्यात मुंबईत धमक्यांचा सिलसिला पाहायला मिळत आहे. कारण, महापौर रितू तावडे यांचे कार्यालय ते बॉलिवूडचे बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांना धमकीचा ई – मेल असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, पंजाबी गायक – अभिनेता दिलजीत दोसांझ, मुंबईच्या महापौर रितू तावडेंचे कार्यालय, दादरमधील तीन ते चार शाळा अशांना धमकीचा मेल आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, धमकीच्या ई-मेलमधील मजकूर आणि घातपाताच्या तारखांविषयी मिळालेली धक्कादायक माहिती आहे. अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये अत्यंत नियोजनबद्ध हल्ल्यांचा दावा करण्यात आला आहे.
मुंबईतील महापौर कार्यालय, शाळा, सेलिब्रिटींची घरं उडवून देण्याची धमकी आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टम मोडवर आलेल्या आहेत. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे घर ग्रेनाइडने उडवून देण्याची धमकी दिली आहे. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान हल्ला करू अशी धमकी दिली आहे. त्यासोबतच प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यालाही धमकी मिळाली आहे. दिलजीत दोसांझ याचा 27 नोव्हेंबरला कॉन्सर्ट होणार आहे, याच कॉन्सर्टमध्ये हल्ला करण्याची धमकी दिली गेली आहे. तर, दादरमधल्या 3 ते 4 शाळांनाही उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्यासोबतच, ऐरोलीतल्या विब्ग्योर शाळेला दुपारी 1 वाजून 11 च्या सुमाराला उडवून देऊ अशी धमकी दिली गेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईच्या महापौरांचे कार्यालयदुपारी 3.11 वाजता उडवू अशी धमकी धमकीचा ई-मेल आल्यानंतर दादरमधल्या शाळांना सुट्टी दिली गेली. विद्यार्थ्यांना घरी पाठवून पोलिसांकडून शाळेत तपास मोहीम राबवण्यात आली आहे. या धमकीच्या संदेशात खलिस्तान चळवळ आणि इतर काही संशयित संघटनांचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ खोडसाळपणा म्हणून याकडे न पाहता सुरक्षा यंत्रणांनी याला अत्यंत गांभीर्याने घेतले असून शाळा आणि रेसकोर्स परिसराची सुरक्षा तातडीने वाढवण्यात आली आहे.

Back to top button