राहुल गांधींच्या परदेश दौर्‍यांची चौकशी करा

आ. परिणय फुके यांची मागणी

नागपूर /22 ऑक्टोबर : राहुल गांधी हे थायलंड, इटली, अमेरिका, चीन आणि व्हिएतनाम येथे जात असतात. त्यांचे परदेशी लोकांशी संबंध असताना देशविरोधी कारवायांचे आदेश तिथून घेऊन येतात का? याची चौकशी व्हायला हवी, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम दौर्‍यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी म्हटले आहे. नागपुरात गुरुवारी ते बोलत होते.
व्हिएतनामला गेलेल्या राहुल गांधी यांच्यावर ते सहलीला गेले, अशी टीका होत आहे. राहुल गांधी हे अविवाहित असल्याचे सांगतात. मात्र, त्यांच्या पक्षाचेच लोक ते ब्रह्मचारी नाहीत, असे सांगतात. त्यामुळेच ते विविध ठिकाणी जात असतात. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कुटुंब आहे, त्यामुळे ते जात असतात. त्यांचे कुटुंबीय परदेशात आहेत, हे शंभर टक्के निश्चित आहे. काही छायाचित्रे व माहिती त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून मिळाली आहे. प्रत्येक व्यक्तीला काम केल्यानंतर आपल्या कुटुंबाची आठवण येत असते व दोन-तीन महिन्यांत तो कुटुंबाजवळ जात असतो. म्हणूनच राहुल गांधी आपल्या पत्नी-मुलांकडे व्हिएतनामला गेले आहेत, असा दावाही फुके यांनी केला. राहुल गांधी यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार दिला आहे.

Back to top button