अमरावतीत साडेसात कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
तब्बल पाच किलो अमली पदार्थ पकडले

* महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची धडक कारवाई
अमरावती /22ऑक्टोबर – महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अहमदाबाद आणि नागपूर पथकाने संयुक्त कारवाई करून अमरावतीजवळ मारुती सुझुकी मोटारीतून तब्बल साडेसात कोटी रुपयांचे 4902 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज आणि 4 ग्रॅम गांजा पकडला असून या प्रकरणातील आरोपी फैजल खान अन्सार खान याने दाखल केलेला जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला.
गुप्त माहितीच्या आधारे अधिकार्यांनी एमएच 46 एपी 3820 क्रमांकाची निळ्या रंगाची संशयित मोटार अडवून तपासणी केली. त्यामध्ये मुस्तकीन खान, शेख परवेज आणि अवैस अहमद हे तिघे प्रवास करत होते. गाडीची सखोल झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून तब्बल 4902 ग्रॅम म्हणजेच जवळपास पाच किलो वजनाचे मेफेड्रोन तसेच 4 ग्रॅम गांजा असा साठा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात





