अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीचाही SIR ला विरोध
कॉक्रोच जनता पार्टीसोबत करणार आंदोलन

नवी दिल्ली /22 ऑक्टोबर -देशात होत असलेल्या डखठ प्रक्रियेवरून आरोप-प्रत्यारोप होतातय. मतदारांचे नाव हटवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. पण विरोधी पक्ष जाणूनबुजून विरोध करत आहे. जेणेकरून बनवाट नावे मतदार याद्यांमध्ये ठेवता यावीत, असा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत.
या आरोपासह एसआयआर किती महत्त्वाचा आहे, हे सत्ताधारी पटवून देत आहेत. मात्र त्याचदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने एसआयआरबाबत केलेल्या विधानावरून मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचं झालं असं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर हे उद्या म्हणजेच 23 ऑक्टोबर 2026 रोजी देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहेत. या हे आंदोलन मतदार याद्यांच्या ’विशेष सखोल पुनरीक्षण’ प्रक्रियेच्या विरोधात केले जाणार आहे. या आंदोलनात प्रभाकर यांच्यासोबत ’कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके, अभिनेते प्रकाश राज, नेहा बोरा आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. हे आंदोलन ’पीपल अगेन्स्ट एसआयआर’ नावाने केलं जाणार आहे. या आंदोलनाचा उद्देश ’एसआयआर’ (डखठ) प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी केली जातेय. यासह ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे.





