दिवाळीत पुणे-नागपूरचे तिकीट पाच हजारांवर

खासगी बसचे दर दुप्पट, विदर्भातील प्रवाशांची लूट

पुणे /22 ऑक्टोबर  :  दिवाळीसाठी गावी जाणार्‍या प्रवाशांची गर्दी वाढताच खासगी बसचालकांनी तिकीटदरात दुप्पट ते तिप्पट वाढ केल्याचे चित्र आहे. एसटी आणि रेल्वेचे आरक्षण पूर्ण झाल्यामुळे खासगी बसचा पर्याय निवडणार्‍या प्रवाशांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत. पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी प्रवाशांना साडेचार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागत आहे. मराठवाड्यातील विविध शहरांसाठीही तिकीटदरांत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसत असताना वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालया कडून (आरटीओ) प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. पुणे शहरात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने राहणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे.

Back to top button