25 ला संघाचा विजयादशमी महोत्सव
नवी दिल्ली येथील भारत भूषण यांची राहणार उपस्थिती

अमरावती /22 ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महानगर शाखेच्या वतीने रविवार, 25 ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. किरणनगर येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम होणार असून, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंपर्क प्रमुख भारत भूषण प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राष्ट्रीय कीटकनाशके व रसायने आणि बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत श्रीराव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हिंदू समाजात संघटनशक्ती आणि जागृती वाढविण्याच्या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयादशमी हा हिंदू समाजासाठी महत्त्वाचा सण असून, या निमित्ताने समाजात एकता, संघटन आणि जनकल्याणाचा संदेश दिला जातो. शांतता आणि मानवकल्याणाचा विचार पुढे नेत समाजाला एकत्र आणण्याचे काम अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून केले जाते. विनीत श्रीराव यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महानगर शाखेने या उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. समाजातील बंधुभाव, एकता आणि संघटनशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महानगर संघचालक उल्हास बपोेरीकर यांनी केले आहे.
नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन
विजयादशमी उत्सवाचे आयोजन रविवार, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता किरणनगर येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. भारत भूषण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील, तर विनीत श्रीराव यांची प्रमुख उपस्थिती असेल. समाजात एकता, संघटनशक्ती आणि जनकल्याणाचा विचार रुजविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उल्हास बपोेरीकर यांनी केले आहे.





