दुर्गापूजेत 53 सुवर्णकारांचे रक्तदान
रक्तदान समितीच्या प्रेरणेतून सामाजिक उपक्रम

अमरावती /21 ऑक्टोबर – दुर्गापूजेच्या उत्सवात सामाजिक बांधिलकी जपत बंगाली स्वर्णकार दुर्गापूजा मंडळाच्या वतीने जुगल किशोर बालाजी मंदिरात आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 53 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदान समितीच्या सहकार्याने आणि पीडीएमएमसीच्या रक्तपेढीच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. उत्सवाचा आनंद साजरा करताना गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला पूजा समितीच्या सदस्यांनीही शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. मंडळाचे अध्यक्ष विश्वजीत गुच्छाईत, उपाध्यक्ष गणेश सेना, कोषाध्यक्ष समीर माझी, चंदन जाना, दीपंकर माझी, सचिव रामपद घोडाई, शिवप्रसाद मैती, सजल मंडल, प्रदीप मंडल, सिद्धार्थ घोडाई, सहसचिव अमिय संत्रा, सुजीत मंडल, संजय दास, रवी माझी, सपन पाल, सोमनाथ भुईया, अनुप दोलाई, प्रशांत शासमल, अमित माझी आणि सौरभ घोडाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान समितीचे महेंद्र भूतडा, अजय दातेवार, हरी परिवार, योगेंद्र मोहोळ, सीमेश शॉफ तसेच माजी नगराध्यक्ष जुगल किशोर पटेरिया, महेश गुप्ता, पीडीएमएमसी रक्तपेढीच्या डॉ. दीपली सावळे, वंदना चौधरी, भागवत गुरुदे, परशुराम पवार, अमोल कुचे आणि रूपेश जाधव यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. महिला पूजा समितीच्या अल्पना घोडाई, रूपाली गुच्छाईत, सोमा माझी, पिंकी मंडल, कनकलता जाना, सुपर्णा मंडल, दिपा शासमल, सरस्वती दोलाई आणि जयंती भुईया यांनीही सहभाग नोंदविला. तसेच गौतम घोडाई, अनूप मन्ना, सुमित गुच्छाईत, सजल गुच्छाईत, शुभेंदू माझी, प्रशांत मैती, तापस मलिक, किशोर गुच्छाईत, मधुमय माझी, सुमित माझी, लक्ष्मीकांत घोष, जयंत मंडल, कौशिक प्रामाणिक, गोपीनाथ मंडल, दिलीप सामंत, उत्पल पाखिरा, शौमेन सामंत, मानव बाघ, बुद्धदेव दंडपाठक, हराधन जाना, कार्तिक सामंत, श्यामा आदक, अरूप मैती, शिशिर माझी आणि श्रीकांत गुच्छाईत यांच्यासह अनेकांनी आयोजनात योगदान दिले.





