अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर 10 राऊंड फायरिंग
2 जण गंभीर जखमी, टायगर सुदैवाने बचावला, सिनेसृष्टीत प्रचंड खळबळ

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळ्या झाडल्या
जुहू पोलिस स्टेशनच्या शंभर मीटरवर थरारक घटना
आरोपींच्या शोधासाठी 15 पथक तैनात
मुंबई /18 ऑक्टोबर :राजधानी मुंबईतील जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित असला, तरी तब्बल 10 राऊंड फायर केल्याचे समोर आलं आहे. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असावा, या शक्यतेची पोलीस चौकशी करत आहेत. जुहू येथील ’पुष्पा पार्क’ भागात ही घटना घडली. फुटबॉल सामना खेळून टायगर श्रॉफ आपल्या चालकासोबत घरी परतत असताना हा प्रकार घडला. यावेळी त्याला पाहण्यासाठी तिथे लोकांची गर्दी जमली होती, त्याच वेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. जखमींना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टायगरचा ड्रायव्हर आणि चाहता उमेश चव्हाण या घटनेत जखमी झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना फोन करून टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती घेतली. पोलिस आयुक्तांना त्यांनी तत्काळ वेगाने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी धमकीच्या ऑडिओनंतर धमकीची फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत असल्याचा पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे.
तब्बल 10 राऊंड फायर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी 15 टीम बनवल्या आहेत. ऊउझ मोहित गर्ग यांनी सांगितले की, पोलिसांनी या घटनेमध्ये 15 टीम बनवली आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, कारवर दहा राऊंड गोळीबार झाल्यानंतर काही कारवर गोळ्या लागल्या तर काही खाली लागल्या. मुंबई पोलिसांच्या जुहू पोलीस स्टेशनच्या गेट समोरच घटना घडली. पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्यापुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपीच्या शोध घेत आहेत. दोन बाईकवरून आरोपी आल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करून जुहू पोलीस स्टेशनच्या गेटवरून एस व्ही रोडला गेले. यानंतर विलेपार्लेकडून अंधेरीच्या दिशेने आरोपी फरार झाले आहेत.





