वीर प्रताप मंडळात 51 पूजाथाळ्यांनी आरती

माता राणीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

अमरावती/16 ऑक्टोबर – राजापेठ प्रताप चौकातील वीर प्रताप दुर्गा मंडळात गुरुवारी सायंकाळी 51 पूजाथाळ्यांनी करण्यात आलेल्या भव्य आरतीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. माता राणीच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या आरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. मंडळाच्या सल्लागारांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या अनोख्या आरतीला भाविकांनी मोठी गर्दी केली. पं. वसंत महाराज देव, प्रफुल्ल देव आणि जुगल महाराज देव यांच्या मंत्रोच्चारात आरती पार पडली. यावेळी भाविकांनी भक्तिभावाने सहभागी होत या सोहळ्याचा आनंद घेतला. आरतीच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष सागर चांडक, स्वागताध्यक्ष, अमरावती मंडळाचे प्रबंध संचालक राजेश अग्रवाल, उपाध्यक्ष गौरीशंकर हेडा, प्रकाश उधवाणी, प्रवीण धानक, महेश बजाज, संजय मुनोत, सुरेश शर्मा, संजय उपाध्याय, विक्की पनिया, विनय शर्मा, कोषाध्यक्ष संजय चोपडा, राजेंद्र चोपडा, सहकोषाध्यक्ष नकुल डाबी, रितेश आसोपा, गणेश तोष्णीवाल, पूजा-अर्चना प्रफुल्ल देव, प्रसाद वितरण गिरीश बजाज, श्याम वर्मा, जुगल देव, संजय जैन, अशोक अंधुरे, प्रचारक महेश शर्मा, रोहित छांगाणी, अ‍ॅड. सुमीत शर्मा, मंडळप्रमुख महेंद्र चोपडा उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्य रसीकभाई जोगी, अविनाश पाटील, राजेश साहू, मनीष हिरोडे, विशाल राठी, अनिल गोगटे, केशव पुरोहित, गोपाल दायमा, प्रवीण दायमा, गोविंद मालाणी, अक्षय डोबा, राजुभाऊ उज्जैनकर यांच्यासह सल्लागार समितीतील पं. वसंत देव, डॉ. चंदू सोजतिया, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, अ‍ॅड. प्रकाश चितलांगे, विनोद डागा, जुगलकिशोर पटेरिया उपस्थित होते. याशिवाय चंदुभाऊ दायमा, मनोज कटारिया, सुरेश पांडे, पप्पू छांगाणी, नवल चांडक, श्याम शर्मा, ओम सोनी, राजू शर्मा, पं. करण पुरोहित, अशोक पुरोहित, अनुपम ठाकूर, अंकित हेडा, मोहन जडिया, राजेश शर्मा, गोविंद सोमाणी, अनिल भाटी, भोपाळ महाराज, दीपक चोपडा, अमन मावकर, संजय मुथा, सुनील गुप्ता, पुष्पराज शर्मा, बाबूसेठ कडेल, जीतू व्यास, दिलीप हरसोडिया, शैलेश लुल्ला, मनोज जोगी, प्रमोद चोपडा, श्याम गुप्ता, राजेश व्यास, संजय केशवानी, पवन व्यास आदी उपस्थित होते.

Back to top button