संविधान आहे तोपर्यंत निर्णय संसदेतच होतील
आंबेडकरांचे नाव घेत फडणवीसांचा विरोधकांना इशारा

मुंबई /16 ऑक्टोबर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन होताना दिसत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीसह विरोधक ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करताना दिसत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत विरोधकांना इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (16 ऑक्टोबर) नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित ‘स्मार्ट नागरिक’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आलं. सुजाण नागरिक-सक्षम भारत (स्मार्ट नागरिक) या उपक्रम अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलीकडेच असे विधान करण्यात आले होते की, जर ही लढाई संसदेत लढली गेली नाही, तर ती रस्त्यावर लढली जाईल आणि सत्ता परिवर्तन होईल. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की, जोपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना अस्तित्वात आहे, तोपर्यंत सर्व निर्णय केवळ संसदेतच घेतले जातील आणि सत्ता परिवर्तन केवळ निवडणुकांच्या माध्यमातूनच होईल. कारण हा भारत आहे, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंका नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्याकडे (विरोधकांकडे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना नाही, ती केवळ भारताकडे आहे. आणि जोपर्यंत आपल्याकडे ही राज्यघटना आहे, तोपर्यंत याठिकाणी निर्णय केवळ संसदेद्वारेच घेतले जातील. या राज्यघटनेत अशी ताकद सामावलेली आहे. गेल्या अनेक वर्षांत या राज्यघटनेवर अनेकदा हल्ले झाले आहेत. देशाच्या लोकशाहीवरच प्रहार करण्याचे प्रयत्न झाले आहेत. तरीही, ही राज्यघटना इतकी भक्कम आहे की, कोणीही भारताच्या लोकशाहीला हानी पोहोचवू शकलेले नाही किंवा ती नष्ट करू शकलेले नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल





