सायन्सकोर मैदानावर राधा-कृष्ण गरब्याची धूम
नंदा गरबा महोत्सवात रंगांची उधळण

अमरावती/15 ऑक्टोबर– सायन्सकोर मैदानावर सुरू असलेल्या नंदा गरबा महोत्सवात राधा-कृष्णाच्या देखाव्याने गरबाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून, नवरात्रोत्सवाच्या उत्साहात महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने गरब्याचा आनंद लुटला. आयोजकांकडून आज तिरंग्याच्या संकल्पनेवर आधारित गरब्याचे आयोजन करण्यात येणार असून, महोत्सवाच्या शेवटच्या 3 दिवसांत अभिनेत्री रिमी सेन, कायनात अरोरा आणि शमिता शेट्टी यांच्या उपस्थितीची माहिती देण्यात आली आहे.
सायन्सकोर मैदानावर क्रिएटर्स शुभारंभ इव्हेंट्सतर्फे नंदा गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या महोत्सवात दररोज गरबाप्रेमींची गर्दी वाढत असून, आकर्षक वेशभूषा आणि पारंपरिक नृत्यामुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राधा-कृष्णाच्या संकल्पनेवर आधारित गरब्यात सहभागी महिला आणि पुरुषांनी पारंपरिक पोशाख परिधान करून या देखाव्याला विशेष रंगत आणली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक गरबा आणि विविध संकल्पनांमधून नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे. माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी सायन्सकोर मैदानावर सुरू असलेल्या नंदा गरबा महोत्सवाला सदिच्छा भेट दिली. या आयोजनाच्या यशस्वितेसाठी क्रिएटर्स शुभारंभ इव्हेंट्सचे जीवन भामकर, निलेश गुहे, गुड्डू धर्माळे, पियुष वसू, अभिमन्यू तायवाडे, भूषण फरतोडे, संकेत कुलट, आदित्य पाटील, अजिंक्य धवने, स्वराज इंगोले, सिद्धिकेश महल्ले, अक्षय पोटे, शिवराज पाटील, रोहन ठाकूर, राहुल मोहोड, स्वराज पोटे आणि पृथ्वी थोरात प्रयत्नशील आहेत.





