राधा-कृष्णाच्या रंगात गरब्याचा जल्लोष

महिफिलच्या बंधन गरब्याचा उत्साह शिगेला

अमरावती /15 ऑक्टोबर – स्थानिक कॅम्प परिसरातील हॉटेल महिफिल इनच्या बंधन लॉनवर आयोजित बारिस्ता गरबा महोत्सवात बुधवारी राधा-कृष्णाच्या संकल्पनेवर आधारित गरब्याने रंगत आणली. दैनिका ‘अमरावती मंडल’च्या माध्यम भागीदारीत सुरू असलेल्या या महोत्सवाला अमरावतीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आज तिरंगी संकल्पनेवर गरबा सादर केला जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रंगलेल्या या उपक्रमामुळे परिसरात गरब्याची धूम पाहायला मिळत आहे.
अमरावती शहरातील गरबा प्रेमींसाठी बारिस्ता गरबा महोत्सव आकर्षण ठरत आहे. बंधन लॉनवर दररोज रंगणार्‍या या उत्सवात सहभागी होणारे नागरिक पारंपरिक गरब्याच्या तालावर फेर धरत आहेत. राधा-कृष्णाच्या संकल्पनेवर आधारित सादरीकरणामुळे बुधवारीच्या कार्यक्रमाला वेगळी रंगत आली. भक्तीभाव आणि उत्साह यांचा संगम साधत सहभागी नागरिकांनी गरब्याचा आनंद घेतला. या महोत्सवाला स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आयोजकांकडूनही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आज तिरंगी संकल्पनेवर आधारित गरबा सादर होणार असल्याने सहभागींसह गरबा प्रेमींमध्ये उत्सुकता आहे. दररोज वेगवेगळ्या संकल्पनांमुळे या महोत्सवात नवे आकर्षण निर्माण होत आहे. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी बारिस्ताचे संचालक सागर भट्टी, सुमित श्रीवास्तव, चंद्रेश भट्टी, राम श्रीवास्तव, अमित राठोड, अंकित चांडक आणि राहुल सेदानी प्रयत्नशील आहेत. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आगामी कार्यक्रमही उत्साहात पार पाडण्यासाठी आयोजकांकडून नियोजन केले जात आहे.

Back to top button