ज्ञानेश कुमारांचा राजीनामा हेच आमचे मिशन

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींचे विधान

आंदोलनाची पुढील रणनिती ठरवली

नवी दिल्ली/13 ऑक्टोबर  : एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात गेल्या काही विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. अशामध्ये सोमवारी काँग्रेससह इंडिया आघाडीने मोठे आंदोलन सर्वोच्च न्यायालयावर घेऊन गेले होते. त्यानंतर मंगळवारी (13 ऑक्टोबर) लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दुपारी 4 वाजता सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या निवासस्थानी चाय पे चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी या सर्व नेत्यांनी बैठकीत या आंदोलनाची पुढील रणनिती ठरवली असल्याची चर्चा होती. या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत पुढील योजना मांडल्या. तसेच, केंद्र सरकारवर निशाणाही साधला. पंतप्रधान मोदींनी आणि अमित शहांनी लोकशाहीची हत्याकेल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे.लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, देशातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही तिची लोकशाही जिवंत करण्यासाठी लढा देत आहोत. कारण, देशाचे संविधान संपवणे एवढे सोपे नाही. देशात लोकशाहीची हत्या करण्यात आली असून ती लोकशाही जिवंत करण्यासाठी आम्ही विरोधक लढा देत आहोत, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. आमची वेगवेगळी आंदोलने नसून एकच, संयुक्त आंदोलन आहे. हे आंदोलन एका विशिष्ट उद्देशाने सुरू आहे. सामान्य लोकांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत आणि लोकशाही वाचवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मिळवणे हा त्यांच्या मोहिमेचाच एक भाग आहे. असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा मतचोरीची योजना समोर आणण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. काल झालेल्या आंदोलनात मथ्य प्रमाणात लोकं सहभागी झाले होते. तसेच यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, संवैधानिक संस्थांना हायजॅक करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. ज्ञानेश कुमार हे एक बाहुल्याप्रमाणे काम करत आहेत. देशात लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे. ज्ञानेश कुमारांना शिक्षा होणारच. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे

Back to top button