अखेर अनिल सोलेंचे बंड शमले

भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार

मुध्यमंत्री फडणवीस यांच्या मनधरणीला यश

नागपूर/12 ऑक्टोबर  : पदवीधर मतदारसंघातून भाजपचे नेते अनिल सोले यांनी बंडखोरी केली होती. अखेर आज त्यांचं बंड शमलं आहे. खुद्द राज्याचे मुध्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांच्या चर्चा झाल्यानंतर अनिल सोले यानी माघार घेतली आहे. मला भाजपने कधीच काढले नव्हते. मी बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही पक्षाने माझ्यावर कारवाई केली नव्हती. मी उचललेल्या प्रश्नांची दखल पक्षाने घेतली आहे. त्याबद्दल सोल्युशन दिलं आहे. त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती सोले यांनी दिली.
भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराला सर्वांनी लागावं असे आवाहन त्यांनी केलं आहे. मी सांगितलेलं पक्षाने ऐकलं आहे. पक्षातील महाराष्ट्रातील सर्वोच्च नेता माझ्या घरी आले आणि त्यांनी माझे ऐकून घेतलं. माझ्यासोबत सर्व जुन्या कार्यकर्त्यांसोबत गेले दोन-तीन दिवस चर्चा विमर्श सुरू होतं. मी गणिताचा विद्यार्थी आहे, शिक्षक आहे. गणित माझ्या लक्षात येते. त्यामुळे मी विचार केला की आपल्या पावलांमुळे भाजपला नुकसान होऊ नये. भाजपचा गणित चुकू नये. आता 27 ऑक्टोबरला तुम्ही पहाल मोठ्या मताधिक्याने भाजप या मतदारसंघात विजयी होईल असा विश्वास सोले यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी यांनी मला सांगितले होते की पक्ष मोठा आहे, तुम्ही समजूतदार आहात, जर देवेंद्र फडणवीस तुमच्याशी बोलत असतील, तर तुम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी मला सांगितले होते. आज जेव्हा अचानक मुख्यमंत्री माझ्या घरी आले, तेव्हा माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, दौरा सोडून मला घरी यावं लागलं. माझा नेहमीच आशीर्वाद शिष्य (सुधाकर कोहळे) सोबत राहिला आहे. मी शिक्षक असल्याने जो प्रश्न घेऊन माझ्या समोर येईल त्याला उत्तर देणे माझा कर्तव्य असल्याचे सोले म्हणाले.
अनिल सोले हे वरिष्ठ नेते आहेत. नागपुरात भाजपच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा राहिला आहे. कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा काम अनिल सोले करत आले आहेत. अनिल सोले यांनी सांगितले होते की पक्षाबद्दल त्यांची नाराजी नाही. तर कार्यपद्धतीबद्दल नाराजी असल्याचे सांगितले होते. त्यांची नाराजी कुठल्या निर्णयाबद्दल नव्हती, तर निर्णयाची प्रक्रिया कशी होते त्याबद्दल होती. निर्णय करताना जास्तीत जास्त लोकांशी बोलून निर्णय केले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. आम्ही त्यांच्या तक्रारींची नोंद घेतली आणि पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करू असे ठरवले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Back to top button