जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा

अकोला येथे लोकदेवता बाबा रामदेवजींचा 674 वा

अकोला /13 सप्टेंबर– राजस्थानचे लोकदेवता बाबा रामदेवजी हे समाजात समानता, प्रेम आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी ओळखले जातात. ते सर्व धर्म आणि समाजातील लोकांसाठी एकता आणि सलोख्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या प्रतिमेतील पांढरा घोडा पवित्रता आणि शक्तीचे, तर ध्वज धर्म आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. सर्वांमध्ये एकच ज्योत आहे, सर्वांचा मालक एक आहे हा त्यांचा मुख्य संदेश आहे. याच भक्तीमय संदेशाचा जागर करत अकोला येथील संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोठ्या राम मंदिरातील श्री रामदेव बाबा मंदिरात बाबा रामदेवजींचा 674 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भजन सम्राट राधेश्याम शर्मा यांनी बाबा रामदेवजींच्या जीवनावर आधारित जन्म गायन आणि गुणगान केले.गेल्या 90 वर्षांच्या परंपरेनुसार आणि चार पिढ्यांपासून चालत आलेल्या सेवाभावाने रामदेव बाबा सेवा समिती हे कार्य करीत आहे. स्व. सूरजकरण जोशी, ओमप्रकाश जोशी, सत्यनारायण बजाज, बालकिसन चांडक, नारायण सरकीवाले यांच्यासह अनेक भक्तांच्या सेवाभावातून ही परंपरा सुरू आहे. आज सकाळी 21 वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात रुद्राभिषेक करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विशेष पूजा-अर्चना करण्यात आली. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक सुखी-संपन्न व्हावेत आणि पाण्याचे संकट दूर व्हावे यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.यावेळी यजमान म्हणून दिनेश जोशी, रिता जोशी, प्रशांत लोहिया, अनिता लोहिया, रमेश लड्डा, प्रमोद अग्रवाल, मनीषा अग्रवाल, कुंजबिहारी जाजू, किसनगोपाल पुरोहित, अजय गुल्हाने, संजय अग्रवाल, विकी झुनझुनवाला, संदीप जोशी, जयप्रकाश चांडक, सुभाष भट्ट, संतोष गोयंका, ओमप्रकाश गोयंका, कृष्णा राठी, संजय पाटील, रूपा यादव, बनवारीलाल बजाज, अ‍ॅड. महेंद्र पुरोहित, हरी चौधरी, हरीश जोशी, सुमित्रा निखाडे, अनिता बागडे, दीपक तिवारी, नितीन ढोले, राधा जाधव, माधव मानकर, मनोहर मानकर यांनी सहभाग घेतला.

Back to top button