एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळे फासले

तिघांना अटक

नवी मुंबई/11 सप्टेंबर : सध्या राज्यभरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळत आहे. एमपीएससीच्या कारभाराविरोधात राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व नाशिक या ठिकाणी आंदोलन झाले आहे. अशातच आता एमपीएससीच्या कारभाराविरोधात संभाजी ब्रिगेड सुद्धा आक्रमक झाली आहे. कारण, आज शुक्रवारी (11 सप्टेंबर) संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना नवी मुंबई येथील एमपीएससीच्या मुख्य कार्यालयात घडली आहे. सचिव हरपाळकर यांच्या तोंडावर काळे फासल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणातव्हायरल होत आहे. तर, या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून संभाजी ब्रिगेडच्या तिघांना अटक केली आहे. याबाबतची माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळेंनी दिली. त्यांनी याबाबत सांगितले की, संभाजी ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांनी गुरुवारी (10 सप्टेंबर) सचिवांची भेट घेतली होती.

Back to top button