आज डफरीनच्या अग्नितांडवाचा अहवाल प्राप्त होणार
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रसारमाध्यमांना माहिती

नागपूर/1 सप्टेंबर: अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीची घटनेची सखोल चौकशी सुरू असून जो कोणी दोषी आढळेल, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. आवश्यकता पडल्यास दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
संबंधित रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री असताना तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.असे असतानाही ही दुर्दैवी घटना कशी घडली, याची सखोल चौकशी केली जात आहे.या चौकशीचा अहवाल बुधवारी सकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे. तेथे व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. त्या व्हेंटिलेटरच्या पुरवठ्याबाबतही चौकशी सुरू आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटकडून राज्यात सुमारे दहा हजार व्हेंटिलेटर पुरविण्यात आले होते.अमरावतीच्या रुग्णालयात नेमके कोणते व्हेंटिलेटर बसविण्यात आले होते आणि या दुर्घटनेमागील नेमके कारण काय आहे,याचा तपास करण्यात येत आहे,असे त्यांनी सांगितले.नागपूर आणि अमरावती विभागात सरासरीपेक्षा सुमारे 22 टक्के पावसाची तूट आहे. विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण आणखी कमी असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात मंगळवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.सध्या पिकांची परिस्थिती समाधानकारक असली तरी पुढील काळात पावसाचा मोठा खंड पडू नये यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात जास्त प्रमाणात तूट आहे. ती चांगल्या पावसानेच भरून निघू शकते, असे बावनकुळे यांनी सांगितले.अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीची घटनेची सखोल चौकशी सुरू असून जो कोणी दोषी आढळेल, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. आवश्यकता पडल्यास दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.





