राहुल गांधींना संयुक्त नेता म्हणून प्रोजेक्ट करावे

चेन्निथला यांचे विरोधी पक्षांना आवाहन

नवी दिल्ली/20 ऑगस्ट : विरोधकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना संयुक्त नेता म्हणून प्रोजेक्ट करावे. राहुल यांना केंद्रस्थानी ठेऊन प्रचारमोहीम राबवली तरच विरोधकांची आघाडी वर्ष 2029 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकू शकेल, असे भाकीतवजा भाष्य त्यांनी केले.
काही महिन्यांपूर्वी केरळमचे गृहमंत्री बनण्याआधी चेन्निथला काँग्रेस पक्ष संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर कार्यरत होते. त्यांनी पीटीआय वृत्तंसस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांना विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याचा प्रस्ताव अप्रत्यक्षपणे मांडला.
राहुल हे दूरदर्शी नेते आहेत. देशातील जनतेशी ते कनेक्ट झाले आहेत, असे प्रशंसोद्गार काढत चेन्निथला यांनी भारत जोडो यात्रांचा संदर्भ दिला. यात्रांच्या माध्यमातून राहुल यांनी देशातील कोट्यवधी जनतेला उत्साहित केले. त्यांचे नेतृत्व देशाला नवी दिशा देईल, असा विश्वांस त्यांनी व्यक्त केला.

Back to top button