14 ला रक्तदान, रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन

महापौर श्रीचंद तेजवानी यांची आढावा बैठक

अमरावती/6 ऑगस्ट : अमरावती पालिकेचा आरोग्य, रक्ताचा नवा निर्धारमहापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत शिबीराचे नियोजनसफाई कामगारांनाही रक्तदान करण्याचे मोठे आवाहनअमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या वर्धमान दिनाचे औचित्य साधत येत्या 14 ऑगस्ट रोजी शहरात भव्य रक्तदान, रक्त तपासणी आणि व्यापक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाउपक्रमाची पूर्वतयारी म्हणून महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. शहरातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम वैद्यकीय सेवा पोहोचावी आणि रक्ताचा तुटवडा दूर व्हावा, या हेतूने हे शिबीर आयोजित केले जात आहे.महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी बैठकीत सर्व विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी व आयोजकांना कडक सूचना दिल्या. शिबीराच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे थंड पाणी, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, स्वयंसेवकांची फौज आणि आपत्कालीन प्रसंगी तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध असावी, असे आदेश त्यांनी दिले. रक्तदान हे जगातील सर्वात श्रेष्ठ दान असून, अपघातग्रस्त आणि थॅलेसेमियासारख्या गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी रक्त हाच खरा आधार असतो. त्यामुळे नागरिकांनी, तरुणांनी आणि महिलांनी यात मोठ्या संख्येने पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन महापौरांनी केले. विशेष म्हणजे, शहराच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या सफाई कर्मचार्‍यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवून स्वतःच्या आरोग्याची तपासणी करावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.या बैठकीला उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते नाना आमले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुस्तके, वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज खान, आरोग्य अधीक्षक विजय बुरे यांच्यासह सर्व ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक, सफाई कामगार, बीटप्यून, सुपरवायझर, कंत्राटदार आणि पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button