अमरावतीत उत्साहात निघाली भाजपची तिरंगा यात्रा

भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मान

-तिरंगामय झाले शहर
-भारत मातेचा जयघोष, पाकविरोधी नारे
अमरावती /18 मे: जम्मू कश्मीर येथील पहलगाममध्ये निर्दोष भारतीयांवर हल्ला करुन 26 जणांची पाकसमर्थित दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या दुष्कृत्याचा भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून बदला घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दहशतवादी आणि त्यांच्या सहकार्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लष्कराला भारतीय सेनेने सळो की पळो करुन सोडले. या मोहिमेत भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्याचा सन्मान म्हणून आज अमरावती शहरात भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली. त्याला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. माजी सैनिकांचीही याप्रसंगी उपस्थिती होती. त्यांचा गौरव करण्यात आला. तिरंगा रॅलीदरम्यान भारत मातेचा जयघोष करण्यात आला. भारतीय सैन्याच्या गौरवार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच पाकिस्तान विरोधात नारे देवून दहशतवादी कृत्याचा निषेध नोंदविण्यात आला. सर्वजण हातात तिरंगा ध्वज घेउन सहभागी झाल्याने शहर तिरंगामय झाले होते.
सकाळी 10 वाजता भारत मातेचे पूजन करून राजकमल चौकातून या तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांनी उपस्थितांना संबोधित केले. देश सेवेसाठी तत्पर भारतीय लष्करातील जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उध्वस्त केल्याबद्दल त्यांनी सैनिकांचे आभार मानलेत. पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने बघितले तर त्याचे डोळे काढण्याची हिंमत या देशातील सैनिकांमध्ये असल्याचे ऑपरेशन सिंदूर मधून सिद्ध झाल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे हे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
राजकमल चौकातून प्रारंभ झाल्यानंतर सरोज चौक व तेथून पुढे जयस्तंभ चौक रॅली पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला नवनीत राणा, नितीन धांडे, सुनील काळे, सचिन रासने, ललित समंदुरकर, प्रशांत देशपांडे, राधा कुरील, कौशिक अग्रवाल, गंगा खारकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल कुळकर्णी यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने माजी खासदार नवनीत राणा, ज्येष्ठ नेते प्रा. रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, माजी महापौर संजय नरवणे, सुनील काळे, सचिन रासने, राधा कुरील, ललित समदूरकर, कौशिक अग्रवाल, गंगा खारकर, कुसुम साहू, विवेक कलोती, बलदेव बजाज, श्रीचंद तेजवानी, नूतन भुजाडे, पद्मजा कौंडण्य, अजय सारसकर, वंदना मडगे, चंदू बोमरे, राजेश साहू, माधुरी ठाकरे, नीता राऊत, लवीना हर्ष, स्वाती कुलकर्णी, आशिष अतकरे, सुनंदा खरड, वंदना हरणे, इंदुताई सावरकर, गंगा अंभोरे, चेतन पवार, सतीश करेसीया, गजानन देशमुख, विनोद गुहे, प्रणित सोनी, मंगेश खोंडे, सुरेंद्र बुरंगे, मनीष चौबे, प्रफुल बोके, छोटू वानखडे, सचिन नाईक, शैलेंद्र मिश्रा, कुणाल टिकले, विशाल डहाके, श्रीकांत फणसे, आकाश पाटील, अमोल थोरात, विकी शर्मा, पंचफुला चव्हाण, राजू कुरील, विवेक चुटके, राजू मेटे, श्रीकांत धानोरकर, किशोर जाधव, प्रदीप सोळंके, राहुल वागरे, श्याम उपाध्ये, जगदीश कांबे, निलेश काजे, सुधीर वाघ, तुषार चौधरी, श्याम साहू, सविता भागवत, शितल वाघमारे, तृप्ती वाट, सतनाम हुडा, किरण गुप्ता, रोशनी वाकडे, कार्तिक समदेकर, अखिलेश खेडेकर, अलका सरदार, धनराज चक्रे, सुधीर बोपुलकर, विशाल तराळ, मिलिंद बांबल, विशाल कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, तुषार वानखडे, मुकेश वासे वाय, अमृत यादव, तुषार अंभोरे, अंकेश गुजर, मनीष देशपांडे, दिनकर वैद्य, सुरज मिश्रा, सुधीर थोरात, किरण भागवत, ज्योती सयरीसे, सुमती ढोके, हरीश चरपे, अवि काळे, अर्चना तालन, पराग चीमोटे, भूषण पाटणे आदी सहभागी झाले होते.

-माजी सैनिकांची उपस्थिती
या रॅलीत माजी सैनिकांनी उपस्थिती लावली. त्यांचा नवनित राणा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यामध्ये श्रीकांत शेगोकर, मेजर रमेश तराळ, प्रशांत ठाकरे, कवीश्वर माहुरे, प्रवीणचंद्र मसराम, दीपक अवघड, कॅप्टन माधव लुंगारे, मेजर अनिल निर्मळ, बी. एस. राय यांचा समावेश होता. सुभाष चंद्र बोस यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले सर्जेराव गलपट यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button